सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड : तालुक्यातील सुकळी जहागीर येथील यवतमाळ युवा काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष राहुल पाटील वानखेडे यांना राहते घरी इन्व्हर्टर पिन बसवते वेळेस शॉक लागल्याने जखमी झाले आहेत, ही घटना काल सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान घडली. घरातील इन्वर्टरची पिन बसवते वेळेस वीजेचा चा जबरदस्त शॉक लागुन खाली कोसळले यात गंभीर जखमी झाले असता त्यांना तात्काळ उमरखेड रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले.


