सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड मरसुळ वरून सुकळीला जाण्यासाठी पावसाळ्यात साडेतेरा किलोमीटर अंतर पार करून जावे लागे कारण मरसूळ वरून उमरखेडला येऊन सुकळीला जावे लागे .परंतु आता फक्त साडेतीन किलोमीटर अंतर होणार आहे एवढेच नव्हे तर पोफाळी,मुळावा वरून माहुर, यवतमाळ कडे जाणाऱ्या वाहनाला बारा किलोमीटर अंतर पार करावे लागत असे परंतु आता मरसूळ मार्गे सुकळीवरून माहूर, यवतमाळ कडे जाता येईल आता बारा किलोमीटर अंतरा ऐवजी फक्त पाच किलोमीटर अंतर होईल ह्या ठिकाणी सात किलोमीटर अंतर कमी होत असल्यामुळे इंधन व वेळेची बचत होईल म्हणून हा रस्ता प्रवाशासाठी , मरसूळ, सुकळी येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे . रस्त्यास मंजुरी मिळाल्यामुळे आता फक्त दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रस्ता होणे अपेक्षित आहे. मरसुळ ते सुकळी हा रस्ता भारतीय जनता पार्टीचे कर्तव्यदक्ष यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी , मा . जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांचा शब्द म्हणजे प्रमाण ह्या वाक्याप्रमाणे त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला . मरसुळ .ते सुकळी रस्त्याचा पाठपुरावा मरसुळ गावाचे रहिवासी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते किसनराव वानखेडे मरसूळकर यांच्या दहा ते पंधरा वर्षाच्या पाठपुराव्या मधून मंजूर झाला ह्या रस्त्यासाठी सुकळी, मरसूळ येथील ग्रामस्थांची व प्रामुख्याने शेतकऱ्यांची रस्ता पूर्ण व्हावा इच्छा होती ती आज पूर्णत्वाकडे गेली असून हा रस्ता व्हावा अशी मरसूळचे रंजू भोयर, बंडू कदम , खंडू पैकीने , मारोतराव वानखेडे , गजानन वान्नरे, गणपत पारवेकर , काशीनाथ कदम, बबन पारवेकर , गंगाधर शिरसागर , डॉ. अनंतराव कदम, तातेराव बेंडके, संभाजी कदम, माणिकराव चव्हाण , काशीनाथ कदम,किसन पुरी , लक्ष्मण वानखेडे,वसंता बनसोड , सुकळी चे राहुल वानखेडे, लक्ष्मण वानखेडे, गजानन वानखेडे, किशोर वानखेडे यांची सुद्धा प्रामाणिक इच्छा होती .मरसूळचे स्वर्गीय तुकाराम भोयर व स्वर्गीय दशरथ वानखेडे ( सुकळी )यांना सुद्धा या रस्त्याबाबत आपुलकी होती निश्चितच त्यांना सुदधा आज रस्ता मंजूर झाल्याचा आनंद झाला असता . ह्या रस्त्याचा प्रश्न सर्व मरसूळ व सुकळी ग्रामस्थ व शेतकरी यांच्या आस्थेचा चा प्रश्न होता सर्वांच्या पाठपुराव्याने व नितीन भुतडा यांचा शब्द म्हणजे प्रमाण या प्रयत्नातून उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदेव ससाणे यांच्या प्रतिसादातून व पाठपुराव्यातून पावसाळी अधिवेशनात मरसुळ ते सुकळी रस्ता सुधारणा करणे बाबत मंजुरी मिळाली ह्याबाबत मरसुळ व सुकळी येथील ग्रामस्थ व शेतकरी बांधव आभार व आनंद व्यक्त करीत आहेत.


