भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव: शिष्यवृत्ती पालक मेळावा या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेचा उपक्रम राबवला जातो. त्यामध्ये इ ५ वी व इ ८ वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते. इ ५ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा व इ ८ वी साठी एन एम एम एस व शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते.याचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात फायदा व्हावा व शाळेची गुणवत्ता सिद्ध व्हावी या हेतूने हा उपक्रम विद्यालयांमध्ये राबवला जातो. पालक मेळाव्याचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील जायभाये यांनी.विद्यार्थी पालक शिक्षक हा एक त्रिकोण आहे हा त्रिकोण जर टिकला तर विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र होतो असे त्यांनी मुलांना बहुमोल मार्गदर्शन केले. या पालक मेळाव्यास प्रमुख उपस्थित असलेले विद्यालयाचे प्राचार्य संजयजी चेमटे यांनी विद्यार्थ्यांना झोपेत स्वप्न पाहू नये ते जागी असताना पहावे, म्हणजे स्वप्न पूर्ण होतात व पालकांनी शिक्षकांवर विश्वास ठेवावा.तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी मी घेतो असे सांगितले. याप्रसंगी उपस्थित पालकांमध्ये ढोरजळगाव ने चे सरपंच गणेश कराड यांनी विद्यार्थ्यांना पाया जर भक्कम असेल तर तो कुठेही गेला तर तो यशस्वी होऊ शकतो असे सांगितले.त्याच बरोबर दिगंबर उकिर्डे यांनी भविष्यात यशस्वी व्हायचे असेल तर शालेय दशेतील स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय पर्याय नाही असे सांगितले.शिक्षक मनोगतात विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक खोले शंकर यांनी परीक्षेच्या संदर्भात अचूक माहिती देऊन विद्यार्थ्यांना भविष्यात होणारे फायदे सांगितले.या पालक मेळाव्यास देविदास गिर्हे,मा चेअरमन भीवसेन केदार,प्रशांत बडे, यांच्यासह इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्याने हजर होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सातपुते सविता यांनी केले.सूत्रसंचालन श्रीम फलके रत्नमाला यांनी केले व आभार म्हस्के सुमित यांनी मानले.