सत्यपाल वाघमारे
तालुका प्रतिनिधी खेड
चाकण खेड- बा.मा.पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिरदवडी चाकण या शाळेत 2023_24 या शैक्षणिक वर्षातील प्रथम पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतिबा एज्युकेशन सोसायटीचे सचिव ईशान यशवंत पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुस्तफा शेख ,शरद मांडेकर व राजेंद्र चव्हाण हे उपस्थित होते. पालक मेळाव्याचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य विजय चव्हाण यांनी केले,तर एस.एस.सी. व एच .एस. सी. 2023 बोर्ड परीक्षाचे निकाल वाचन सौ. निखांडे यांनी केले. विद्यालयाच्या यशस्वी निकालाची उज्वल परंपरा अबाधित ठेवण्याचे कार्य शिक्षक व विद्यार्थ्यांनी केले असे प्रा. सौ निखाडे मॅडम यांनी सांगितले .शालेय शिस्त तालुका क्रीडा स्पर्धा व गणवेश याबद्दल माहिती क्रीडा विभाग प्रमुख दादासाहेब ढाकणे यांनी दिली तर परीक्षा व बाह्य परीक्षा व सांस्कृतिक विभागाची माहिती सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ भामरे यांनी सांगितली .
ई लर्निंग प्रोजेक्ट व विद्यालयाच्या भौतिक विकासाबद्दल माहिती व नवीन पालक संघ कार्यकारणी निवड विद्यालयाचे प्राचार्य विजय चव्हाण यांनी केली. विद्यालयाची स्थापना ते विद्यालयाची आजपर्यंतची प्रगती व भौतिक सुविधा सुधारणा याची माहिती व विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन करून ज्ञान प्राप्त केले पाहिजे व स्वतःचे विद्यार्थ्यांनी उज्वल करिअर केले पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांना पालकांनी अवांतर वाचन करायला लावावे असे मार्गदर्शन संस्थेचे सचिव ईशान यशवंत पवार यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले. सन 2023_24 पालक शिक्षक संघाचे कार्याध्यक्षपदी सौ. पल्लवी महेश मुळे यांची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र चव्हाण तर खजिनदारपदी शरद मांडेकर यांची निवड करण्यात आली अशी माहिती परीक्षा विभाग प्रमुख व पालक संघ प्रतिनिधी अनिल चौगुले यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ जयश्री भामरे यांनी केले