करामत शाह
ग्रामीण प्रतिनिधी, आगर
अकोला: दुरसंचार विभागाद्वारे प्रत्येकाच्या मोबाइलवर धोक्याचे सायरन वाजणे सुरु झाले आहे. हे सायरन का वाजत आहे याची विचारणा नागरीकाद्वारे होत आहे मोबाईल धारकाच्या मोबाइलवर धोक्याचे सायरन वाजत असल्याने नागरीक चांगलेच भयभीत झाले आहे नेमके कशासाठी हे सायरन अलर्ट करण्यात येत आहे त्याचा कुठलाही तपशील दुरसंचार विभागाने दिला नाही त्यामुळे हे सायरन अलर्ट कशासाठी होत आहे असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे दुरसंचार विभागाने टेस्टींग सुरु आहे धोक्याच्या परीस्थीती जर निर्माण झाली तर पुर्वीच्या काळी जसे सायरन ( भोंगे ) वाजवले जायचे तसे आता प्रत्येकाला मोबाईल वरून सुचित करण्यासाठी हा टेस्टिंग अलर्ट सुरु केला गेला आहे पण याविषयी कुठलीही माहिती किंवा सुचना न दिल्याने नेमके एकाचवेळी हे सायरन का वाजले अशी विचारणा प्रत्येक जण करत आहे अकोल्यात अनेकांच्या मोबाईल आज एकाचवेळी खणखणल्याणे सर्वांनी विचारणा सुरु केली आहे
जोपर्यंत मोबाईल धारक तो मॅसेज वाचत नाही तोपर्यंत तो सायरन अलर्ट 30 सेकेंद वाजत राहील.कायदा आणि सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती, इतर आपत्ती दंगल सदृष्य परीस्थीती या संदर्भातील अलर्ट देण्यासाठी हा सायरन अलर्ट वाजणार आहे.तुर्तास सर्वांच्या मोबाइलवर वाजणारा अलर्ट हा टेस्टिंग अलर्ट असुन त्या अलर्टने घाबरुन जाण्याची गरज नाही अशी माहीती प्राप्त झाली आहे