विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
ढाणकी : हे अवैध धंद्याचे माहेरघर म्हणून प्रसिद्धीस पावल्यागत दिसून येत आहे. बीटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून अवघ्या काही दिवसातच एका पाठोपाठ एक अशा अवैध धंदे करणाऱ्यावर सलग तिसऱ्यांदा पकडुन कारवाईचा बडगा उगारलेला दिसत आहे.यावरून हे सिद्ध होते की ,या आधी पोलीस प्रशासन व अवैध धंदे करणारे यांच्यात काहीतरी सावळा गोंधळ असल्याचे निदर्शनास येत आहे.कारण नवनिर्माचित बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या दहा बारा दिवसातच अवैध हातभट्टी व देशी दारू विक्रेत्यांवर गुणा दाखल करण्यात आला तर तेथून काही दिवसातच ३ लाख९९ हजार रुपये किमतीचा गुटखा व २ लाख रुपयाचा ऑटो मिळून सहा लाख रुपयाचा मुदेमाल जप्त करण्यात आला व कारवाई करण्यात आली आणि आज दिनांक १४/७/२०२३ रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार स्वप्नील रमेश पराते वय २५ वर्ष रा. ढाणकी हा अवैध देशी दारू वाहतूक करताना मिळून आला,त्यास ताब्यात घेऊन १९२ देशी दारूच्या बॉटल ४ पेटी किंमत १३,४४० रू व मोसा.क्रमांक एम एच २९ डी. के१६३८ ची किंमत ५०००० हजार एकूण ६३४४० रू.किमतीचा अवैध देशी दारूचा माल मिळाला असून अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नसून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सदरची कारवाई ठाणेदार सुजाता बनसोड सोबत पी एस आय टीपूर्णे, एन पी सी चाटे, पी सी, भालेराव पी सी प्रवीण बीटरगाव पोस्ट नी केली .पुढील तपास चालू आहे.