माबुद खान
तालुका प्रतिनिधी, जिंतूर
जिंतूर : कोरोना काळात बंद केलेले आठवडी बाजार शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते ते पुर्वत जुन्या जागेवर भरविण्यात यावे अशी मागणी शहरातील सुजाण नागरिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे. सविस्तर माहिती अशी की शहरातील जुन्या नगर परिषद कार्यालयाच्या बाजूला दर्गा हजरत मिसकीन शाह परिसरातील जागेवर भरत होतें पण कोरोना काळात बंद करण्यात आले होते, तेव्हा पासून आजपर्यंत शहरात आठवडी बाजार भाजी मंडई व येलदरी रोड वर भरले जात आहे ते आठवडी बाजार जुन्या जागेवर भरविण्याची मागणी परिसरातील सुजाण नागरिकांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगर परिषद यांना दिले आहे या निवेदनावर सय्यद जाबेर मुल्ला, युवराज घनसावध,शेख यासीन करीम, आकाश चराटे, युसुफ कबीर,सचीन रायपत्रीवार अखलाख काजी, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.