बिहारीलाल राजपूत
तालुका प्रतिनिधी भोकरदन
भोकरदन: भोकरदन तालुक्यातील आव्हाना, भिवपुर, गोकुळ, सुभानपुर पेरजापुर अश्या पाच गावाच्या नागरिकांना तालुक्याच्या गावी जाण्यासाठी पावसाळ्यात कोरडा दिवस कधी येईल याची वाट बघावी लागते. कारण स्वातंत्र्यानंतरही तालुक्याहून या गावांपर्यंत अद्याप बस सेवा सुरु झालेली नाही. रस्त्याची तब्बेत जास्तच खराब झाल्याने खाजगी वाहनधारक सुध्दा ह्या रस्त्यावर भाडोत्री वाहन चालवीत नाही. सरकारी कामकाजा साठी नागरिकांना तालुक्याच्या गावी जावेच लागते पण पेरजापुर ते भोकरदन अंदाजे चार ते साढे चार कि.मी. चा रस्ता पावसाळ्याने इतका खराब झाला आहे की सदर रस्त्यावर मोटार साईकल चालवने ही दुरापास्त झाले आहे. एक खड्डे चुकवले तर दुसरे खड्डे आहेच त्यामुळे रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही. संबधित विभागाने ह्या कडे लक्ष घालावे व नागरिकांची रस्त्यामुळे होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे.


