सलीम सय्यद
तालुका प्रतिनिधी वडवणी
वडवणी : दवाखान्यांना दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र शहरात अनेक दवाखान्यांमध्ये कोणत्या उपचारासाठी किती रुपये लागतात, याची माहिती देणारे दरपत्रक नसल्याची बाब समोर आली आहे.बॉम्बे नर्सिंग होम कायद्याच्या तरतुदीत बदल करण्यात आला असून, त्यात प्रत्येक दवाखान्यांना दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नवीन तरतुदींची अंमलबजावणी सुरु झाली असली तरी शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे रुग्णांनाही दरांविषयी माहिती मिळत नाही. शहरात काही. रुग्णालयांची पाहणी केली असता दरपत्रकाविषयी अजून तेवढे गांभिर्याने घेतलेले दिसत नाही.आतापर्यंत एकाही रुग्णालयावर कारवाई नाही. १ बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार दरपत्रक लावणे दवाखान्यांना बंधनकारक केले असले तरी त्याचे पालन शहरात केले जात नाही. मात्र अशा दवाखान्यांविरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही. आतापर्यंत एकही कारवाई झाली नाही.गोरगरीब रुग्णांची फसवणूक होऊ नये, या उद्देशाने नियम तयार केले जातात. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात असे दरपत्रक लावणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे हे दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात असावे, असे नियमात सांगितले आहे. मात्र शहरात अनेक रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावलेले. नसल्याचे पुढे आले. रुग्णांचा होणार फायदा बॉम्बे नर्सिग होम कायद्यान्वये सर्व रुग्णालयासमोर दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आले. हे दरपत्रक असेल तर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचाही फायदा होणार आहे. त्यांना उपचाराचा अंदाजित खर्च समजेल.उपचार करण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या, एक्स-रे, रक्त तपासणी, शस्त्रक्रिया यासाठीचे दर निश्चित केले असून, त्यानुसार डॉक्टरांना दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.