सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. १२ जूलै २०२३ बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील निवृत्ती झालेल्या शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा शाळेत नियुक्ती करण्याच्या निर्णया आणि आदेशा विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात डीएडबीएड झालेले अनेक विद्यार्थी आहेत. त्यांच्या हाताला रोजगार मिळत नसल्याने हतबल होऊन गेले आहेत. सुशिक्षित बेरोजगार असल्याने भीक सुध्दा मागता येत नाही. अनेक सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी हाताला काम नसल्यामुळे वाईट मार्गाने पैसा कमावण्यासाठी करताना दिसतात. आई वडिलांनी शिक्षणासाठी कर्ज काढून शिकवले आणि आज मात्र कुठे शासकीय नोकरी तर सोडा खाजगी नोकरीसुध्दा मिळणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शाळांमध्ये निवृत्ती झालेल्या शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करून घेणे म्हणजे लाखो डीएड बीएड झालेल्या सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांचा रोजगार हिरावून घेणे आणि त्यांच्यावर अन्याय करून त्यांना वाईट मार्गाला जाण्यासाठी प्रवृत्त करणे होय. स्थानिक स्वराज्य शिक्षण व्यवस्था उदो उदो करणारा शासन निर्णय रद्द करण्यात यावा. यासाठी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे मुख्यमंत्री, प्रधान सचिव, शालेय शिक्षणमंत्री, ( शालेय शिक्षण क्रीडा विभाग ) मंत्रालय, आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांना शासनाच्या निर्णयाविरोधात लक्षवेधी आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.


