रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येत असणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये हिवरखेड येथील सेंट पॉल अकॅडमीचे अठरा विद्यार्थी यांची निवड झालेली आहे. हिवरखेड शहरांमध्ये व संपूर्ण तालुक्यामध्ये पहिल्यांदाच सेंट पॉल अँकॅडमी शाळेचे एकूण 18 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत पास झाले असून स्कॉलरशिप साठी पात्र ठरले आहेत.इयत्ता आठवीचे नैतिक हिवराळे, स्नेहा राऊत, सायली तायडे, पूर्व बनकर, वैष्णवी मेतकर हे विद्याथी स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहे. तर इयत्ता पाचवी मधून योगेश्वरी दामधर, स्वरा तिडके, नेहा टोहरे, प्रणित राऊत, मिरल भोपळे, श्रीकांत बाळापुरे, अंशुदा गावंडे, अनिश धुळे, नंदिनी नाठे, श्वेता चौरे, रश्मी टोहरे, समृद्धी धूळ, आराध्य मेतकर यांची निवड झाली आहे
सेंट पॉल अकॅडमी शाळेने आपल्या उज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम ठेवलेली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष प्रा. नवनीतजी लखोटीया सर ,संस्थेचे उपाध्यक्ष लूणकरंजी डागा सर संस्थेचे सचिव प्रमोदजी चांडक सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत तिवारी सर यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वेळा व्यतिरिक्त स्कॉलरशिप चे क्लास शाळेतच घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर, गाँधी मॅडम, चैतन्य खारोडे सर, दहि सर,कातव सर, अहेरकर सर,अमानकर सर,अनिल सर, बावणे सर, येलुकार मॅडम, बाजारे मॅडम
पाटील मॅडम ढोले मॅडम, यांना दिले आहे