निशांत मनवर.
शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत हा रस्ता खड्डेमय झाला.सार्वजनिक बांधकाम विभाग व उमरखेडचे लोकप्रतिनिधी या जीव घेणे खड्ड्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत.सदर खड्डे रोडच्या मधोमध झाल्याने व त्या मध्ये पावसाचे पाणी भरल्याने त्या खड्ड्याचा अंदाज लागत नसल्या मुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.या रस्त्यावर ये जा करणारे मोठे ट्रक, टेम्पो, शासकीय व खाजगी प्रवाशी बसेस, ऑटो रिक्षा,मोटर सायकलस असे अनेक वाहने व पायी चालणारे नागरिक ये जा करत असतात.तसेच दोन्ही चौकामध्ये नागरिकांची गर्दी जास्त प्रमाणात असते. व बाजूलाच नगरपालिकेचे छ.संभाजी राजे उद्यान असल्यामुळे सायंकाळी नागरिकांची गर्दीमध्ये वाढ होत असते.म्हणून अपघात होण्याची शक्यता वाढली असल्याने उमरखेड सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच लोकप्रतिनिधीने लोकांच्या जीवाशी न खेळता सदर रस्ताचे मोठे मोठे झालेले खड्डे त्वरित भरून, दुरुस्ती करून द्यावा अशी आम जनतेची मागणी होत आहे.