शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : लोअर दूधना प्रकल्पाच्या गेट जवळील नदी पात्रात बुडून दोघा युवकांचा मृत्यू झाला.रविवारी दुपारी चारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सेलू शहरातील गायत्री नगरातील रोहित टाक वय 23 व नितीन साळवे वय 25 हे दोघे मित्र रविवारी दुपारी निम्न दुधना प्रकल्पाच्या गेट जवळ दाखल झाले या दोघांना दुधना पात्रात उडी मारून पोहण्याचा मोह झाला. दोघांनीही नदी पात्रात उतरल्यानंतर पोहण्यास सुरुवात केली, परंतु पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे खोलवरील पाण्यात बुडून मृत्यू पावले. या पात्राजवळील प्रत्यक्ष दर्शनी तो प्रकार पाहिल्याबरोबर धावपळ सुरू केली, सेलू पोलिसांना संपर्क साधला. प्रत्यक्ष दर्शनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी नदी पात्रात त्या दोघा युवकांचा शोध घेतला तेव्हा सायंकाळी उशिरा दोन्हीही यूवकांचे मृतदेह हाती लागले. दरम्यान या घटनेने गायत्री नगरात मोठी शोककळा पसरली.


