भारत बुरशे
ग्रामीण प्रतिनिधी पुसद
पुसद : उमरखेड रोड वरील कोपरा फाट्याजवळ १० जुलै रोजी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिकाचा मृत्यू झाला प्रकरणी संस्थेच्या सचिवाने शहर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे संस्थेच्या कर्मचाराचा अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरलला आहे वसंत किसन राठोड वय ६२ वर्ष रा. सप्तगिरी नगर असे मृत झालेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे युवक मंडळाचे शिक्षण संस्थेचे सचिव विजय कनिराम जाधव वय. ५३ वर्ष यांनी फिर्याद दिली आहे शहर पोलिस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या वसंत राठोड हे युवक मंडळ शिक्षण संस्थेमध्ये वरिष्ठ लिपिक पदावर नोकरी करत होते ते अंदाजे ४ ते ५ वर्षापूर्वी वरिष्ठ लिपिक पदावरून सेवा निवृत्त झाले होते निवृत्ती नंतर ते शेलू येथील चार एकर शेती वाहत होते घटनेच्या दिवशी दुपारी १२.२० वाजताच्या दरम्यान शेतीचे काम पाहण्यासाठी सप्तगिरी नगर येथील राहत्या घरुन कोपरा फाट्याजवळळिल बोजेवार यांच्या शेतातून शेलू येथे दुचाकी क्रमांक एमएच २९ एयु ७४३२ने जात होते अशावेळी अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून दुचाकीला धडक दिली त्या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवारामध्ये त्यांची पत्नी सुभद्राबाई राठोड व एक मुलगा व एक मुलगी असे आहेत अज्ञात वाहन चालका विरोधात शहर पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमानवे गुन्हे दाखल करण्यात आले असून अज्ञात वाहनाचा शहर पोलिसांकडुन तपास सुरु आहे.