भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव : आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव या ठिकाणी आज इयत्ता अकरावीला नव्याने प्रवेश घेतलेल्या कला विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्थेच्या विश्वस्त तथा जि प सदस्या सौ हर्षदाताई काकडे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम थोरात,सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक जिल्हा परिषद अहमदनगर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते,पडताळणी अधिकारी प्राचार्य किशोर अहिरे माणिकताई करंदीकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अहमदनगर प्राचार्य सुनील शिंदे नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दहिगाव ने,प्राचार्य लक्ष्मण बेळगे प्राचार्य अविनाश घोरपडे कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीम रूपा खेडकर पर्यवेक्षक शिवाजी पोटभरे आदि मान्यवर उपस्थित होते.इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे पेन,गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन मोठ्या उत्साहात स्वागत केले.इयत्ता बारावीचा विद्यार्थी सुनील चव्हाण याने इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्याना प्रातिनिधिक स्वरूपात शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ हर्षदाताई काकडे यांनी इयत्ता अकरावीला नव्याने प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा संदेश दिला.विद्यार्थ्यांचा इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षामध्ये सामाजिक व शैक्षणिक विकास घडवून येत असतो.हे दोन वर्ष आयुष्याला दिशा देणारे वर्ष असतात.त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आपले जीवन घडवावे व कर्तृत्व सिद्ध करावे असे सांगितले.पालकांनी देखील आपल्या पाल्याची प्रगती जाणून घेण्याकरिता कनिष्ठ महाविद्यालयाच्या संपर्कात राहावे असे सांगितले.कार्यक्रमाचे अतिथी श्रीराम थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले,की कला विज्ञान व वाणिज्य या शाखेपैकी कोणतीही शाखा कमी दर्जाची नाही.जर चांगला अभ्यास केला,तर सर्वच शाखा तुमचे भविष्य घडवणाऱ्या आहेत.विद्यार्थ्यांनी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयीन जीवनात विविध शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.तसेच आपला एखादा छंद जोपासत ज्ञान संपादन करावे.शिक्षणाच्या माध्यमातून आपला शारीरिक बौद्धिक व मानसिक विकास साध्य करावा.अपयशाने खचून न जाता जिद्द मेहनत परिश्रम या बळावर यश संपादण करावे.पालकांनी देखील आपल्या पाल्याला शिक्षण घेत असताना पूर्णपणे साथ द्यावी.याकार्यक्रमासाठी अकरावीला नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्राचार्या,श्रीमती रूपा खेडकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा प्रतिमा उकिर्डे व प्रा जरीना शेख यांनी केले.पर्यवेक्षक शिवाजी पोटभरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.