विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : शेतकऱ्यांचे आराध्य दैवत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनी संकल्प बद्ध होऊन वसंतराव नाईक साहेबांच्या कार्याचा व विचाराचा वसा घेऊन विद्यमान राज्याचे सत्ताधारी आणि विरोधकांनी आरोप प्रत्यारोपाच्या कक्षेबाहेर समन्वय ठेवून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध करणारे शाश्वत धोरण राबवायला हवे. असे प्रतिपादन महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे कृषी दिनानिमित्त आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात उपस्थितांना शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांनी मार्गदर्शन केले. 2018 पासून वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीदिनी कृषी दिनानिमित्त आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये धैर्याने न खचता ज्या महिलांनी आपल्या कर्तबगारिने प्रपंच कष्टाने उभं केलं अशा कर्तबगार महिला शेतकऱ्यांचा कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या भगिनीचा साडी चोळी शाल फळ देऊन यथोचित सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवत हा कार्यक्रम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यात आयोजित करण्यात येतो. यावेळी वागद इजारा येथील ग .भा. नबी बाई पांडुरंग राठोड या शेतकरी महिलेचा साडी चोळी शाल श्रीफळ देऊन गावातील उपसरपंच सौ. मालु चव्हाण ,सौ. कल्याणी संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य सौ रुक्मिणी अशोक जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी वसंतराव नाईक साहेबांच्या फोटोचे पूजन करून सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाल्य अर्पण करण्यात आले .कार्यक्रमाच्या सुरुवातीस बुलढाणा जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावर अपघातामध्ये मृत पावलेल्या सर्व अपघातग्रस्त मृतकांना गावकऱ्यांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती रमेश सवाई, जाधव नाईक, शेतकरी नेते मनीष जाधव, अशोक धर्मा, जाधव सुनील राठोड, मनोहर चव्हाण, भिकन राठोड, कैलास राठोड होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी राठोड यांनी केले तर आभार आकाश राठोड यांनी केले .वसंतराव नाईक साहेबांची जयंती मोठ्या हर्ष व उत्साहात पार पडली यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व गावकरी उपस्थित होते.