महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट…
अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : पातूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मा.हर्षु रत्नपारखी दि.30/6/023 रोजी सेवानिवृत्त झाले.सेवानिवृत्त दिनानिमित्त मा.हर्षु रत्नपारखी साहेबांचे सहपत्नी व कुटुंबासह पातुर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा.हरिष गवळी साहेब, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा सोनुने मॅम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मा. गजानन पोटे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व भेट वस्तू तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी निवृत्त कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन टीम तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष अर्जुनसिहं गहिलोत,पातूर तालुका अध्यक्ष अविनाश पोहरे, पवन सुरवाडे, निखिल उपर्वट, कु.कोमल सुरवाडे, कु.सुवर्णा चव्हाण,कु.सानिका दुरळकर , करण राठोड,आशिष राठोड, सय्यद तौसिफ़, तुषार सिरसाट, गौरव सरदार, महेश जाधव,रोहन राठोड आदी सदस्य उपस्थित होते.


