सुनिल गेडाम
तालुका प्रतिनिधी, सिंदेवाही
सिंदेवाही : एकात्मिक बाल विकास प्रकल्प सिंदेवाही च्या माध्यमातून अंगणवाडी मदनीस च्या पद भरती प्रकिया च्या जागा निघाल्याने दलाल वर्ग चांगलाच सक्रिय झाला असून या मध्ये नोकरी ची आस करीत असलेल्या भोळ्या भाबळ्या महिलांची फसवणूक होऊन आर्थिक फटका बसण्याची चिन्ह दिसत आहे.अंगणवाडी मदतनीस च्या पदभरती निघाल्याने तालुक्यातील महिला वर्ग नोकरी मिळण्याच्या आशेने फार्म भरत आहेत, या मध्ये काही सक्रिय दलाल तुम्हाला लावूनच देऊ अश्या भुलथापा देण्याचा प्रयत्न करीत आहे. फार्म भरणाऱ्या महिलांना हे दलाल आपल्या बुद्धीचातुर्याने आमची साहेबांशी ओळखी आहे साहेब आमच्या शब्दा बाहेर जात नाही तुमचं सिलेक्शन नक्की होईल असे खोटारडे आश्वासन या महिला वर्गना देऊन त्याच्या कडून जमेल तेवढी रक्कम उकळण्याच्या प्रयत्नात दलाल वर्ग टपून बसला आहे. दलाल वर्गा मुळे महिलांची फसवणूक होऊ शकते म्हणून एकात्मिक बाल विकास प्रकल्प सिंदेवाही च्या माध्यमातून या मदतनीस भरती प्रक्रिये मध्ये कोणीही कोणाशी पैश्याचा व्यवहार करू नये अशी जाहिरात काढून ती जिथे मदतनीस च्या जागा निघाल्या आहेत तेथील ग्राम पंचायत मध्ये लावली आहे.तरी पण भरती प्रक्रिये मधील अर्जदार महिला या जाहिराती कडे परस्पर दुर्लक्ष करून सक्रिय दलाला च्या मार्फतीने फार्म प्रक्रिये साठी प्रयत्न करीत आहेत.या महिलांच्या माहिती साठी कोणताही दलाल तुम्हाला लावून देऊ शकत नाही तुम्हाला परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधारावर तुमची निवड होईल या साठी कोणत्याही दलाल वर्गाला याचं श्रेय जाणार नाही या साठी कोणालाही एक रुपया देण्याची गरज नाही. ज्या दलाला कडून तुम्ही लागण्याची अपेक्षा करता ते सर्व फोल आहे, जर मार्क कमी असले तर दलालांनी कितीही आपटली तरी तुम्ही ही नोकरी मिळवू शकत नाही हे लक्षात घेऊनच आपला फार्म टाकावा.कोणत्याही दलाला च्या भुलथापा व आश्वासनाला
बळी पडून आपलं आर्थिक नुकसान करू नका असे वारंवार सांगून सुद्धा दलाल वर्गाच्या आशेने आपल्याला नोकरी मिळेल या उद्देशाने या सक्रिय दलाल च्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसत आहे. त्या मुळे पदभरती बाबत उमेदवारांना गोर गरीब महिलांना महागाईच्या काळात या सक्रिय दलाल वर्ग कडून मोठा आर्थिक फटका बसल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.