रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुका विधी सेवा समिती तर्फे न्यायालय दि.२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त माजी प्राचार्य गजानन निमकर्डे व संतोषकुमार राऊत (योगशिक्षक) यांनी योगासन, प्राणायाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. योग प्राणायाम यांच्यामुळे शरीर कसे निरोगी बनू शकते याविषयी योगशिक्षक यांनी माहिती दिली. सोबतच नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. विविध प्रकारच्या व्यसनांमुळे होणाऱ्या विपरीत परिणामांचे माहिती देण्यात आली. योगदिनाच्या कार्यक्रमाला श्री चकोर श्रीकृष्ण बाविस्कर जिल्हा न्यायाधीश,श्री एम. एस काळे दिवाणी न्यायाधीश , श्री बी.बी चौहान सह दिवाणी न्यायाधीश,श्री व्हि. एम रेडकर (२रे सह दिवाणी), विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अँड. सुरेंद्र पोटे, सचिव विजय चौहान , अँड.महेश देव, अँड. सतीश उगले, अकोट न्यायालयातील न्यायालयीन कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक प्रशांत शेंडे, सामाजिक कार्यकर्ते विजय जितकर, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.हर्षलता नाथे, प्रास्ताविक अँड. देवानंद फुसे,तर आभार अँड. रतन पळसपगार यांनी मानले.