संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
लोकनेते प्रदिप दादा गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त दादांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की, नेहमीच आपण माझ्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असता, पण या वर्षीचा उपक्रम जरा वेगळ्या पद्धतीने असावा, जसे की पक्षाची संघटनात्मक बांधणी भक्कम करण्याच्या दृष्टीने उपक्रम राबवावा. त्यामुळे प्रदिप दादा गारटकर यांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी च्या इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक बूथ वरती जाऊन (वन बूथ – टेन युथ) या उपक्रमाचा संकल्प केला आहे आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी चे बळकटीकरण करण्यासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येक गावातील प्रत्येक बूथ वर जाऊन त्या भागातील 01 BLA (Booth Level Assistant) आणि सोबतच 10 कार्यकर्त्यांची निवड करत आहेत. जवळपास हे काम 07 दिवस (29 मार्च ते 04 एप्रिल) चालणार आहे. अशा या बूथ वर काम करणाऱ्या बूथ प्रमुखांचा जाहीर मेळावा रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी 05:00 वाजता गुरुकृपा सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेला आहे. या मेळाव्यासाठी इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी चे तसेच प्रदिप दादा गारटकर मित्र परिवाराचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही विनंती. विशेष म्हणजे स्वतः प्रदिप दादा गारटकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भेटायला येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे की, भेटायला येताना हार, तुरे, शाली व पुष्पगुच्छ न आणता, शक्य असेल तर एखादं वाचनीय पुस्तक आणावं. जेणेकरून ते पुस्तक शहरातील अभ्यासिकेला/वाचनालयाला भेट देऊन शहरातील युवक/युवतींना भविष्यासाठी प्रेरित करण्यासाठी मदत होईल.







