संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
इंदापूर तालुक्यातील अकोले येथील वनक्षेत्रातील पाणवठ्यामध्ये मदनवाडी येथील शिव फाउंडेशनच्या वतीने हरिण,ससे,कोल्हे, लांडगे आदी वन्य प्राण्यांसाठी पाणी सोडण्यात आले. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. यावेळी वन्य प्राण्यांना अनेकदा रस्त्यावर अपघाताला सामोरे जावे लागत होते. पाणवठ्यांमध्ये पाणी सोडल्यामुळे वन क्षेत्रातील प्राण्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.याबाबत बोलताना शिव फाउंडेशनचे अध्यक्ष संपत बंडगर म्हणाले, सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे येथील प्राण्यांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. ही बाब विचारात घेऊन शिव फाउंडेशनच्या वतीने अकोले, पोंधवडी व भादलवाडी येथील कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. उन्हाळ्यामध्ये गरजेनुसार हे कृत्रिम पाणवठे भरून प्राण्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.कार्यक्रमाचे संयोजन शिव फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले यावेळी, शिव फाउंडेशनचे अध्यक्ष संपत बंडगर, संतोष सवाने, औदुंबर हुलगे, अल्ताफ शेख, दिनेश मारणे, जैन संघाचे संतोष अब्बड, अकबर तांबोळी, योगेश चव्हाण आदी उपस्थित होते.







