सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : दिनांक 30 जून 2023 शुक्रवार रोजी जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथमिक मराठी शाळा सुकळी जहागीर येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम वानखेडे यांचे अध्यक्ष खाली. प्रवेश उत्सव कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रम प्रसंगी पत्रकार माननीय आयुब खान पठाण शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शकील खान पठाण शाळा व्यवस्थापन समिती चे माजी अध्यक्ष गजानन वानखेडे शाळेचे मुख्याध्यापक श्री बी एल इनकर व या प्रसंगी वर्ग पहिलीतील विद्यार्थ्यांना पुस्तक पुष्पगुच्छ खाऊ वाटप करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देणे आणि त्यांना आनंददायी शिक्षण देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, म्हणूनच इयत्ता पहिलीसाठी उद्दिष्ट समोर ठेवून शाळेच्या पहिल्या दिवशी ३० जुन २०२३ ला येथे सत्र २०२३-२४ या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला नवीन प्रवेशित विद्यार्थांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.नंतर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रवेश दिन साजरा केला. या. यानंतर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या नंतर विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन-अध्यापना विषयी गोडी निर्माण व्हावी म्हणून डॉ.अयुबखा पठाण पत्रकार (दैनिक सत्ता शासन तालुका प्रतिनिधी ) दर्पण पत्रकार संघ अध्यक्ष उमरखेड यांनी मुलांना मार्गदर्शन करुन शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांचे वितरण करण्यात आले. अशा आनंददायी वातावरणात शाळेतील सर्व शिक्षकांनी आपल्या अध्यापन कार्याला सुरुवात केली. शाळेच्या प्रथम दिवशीच शाळेत सर्व शिक्षक व बहुसंख्येने विद्यार्थी शाळेत उपस्तित होते.