वैभव गुजरकर
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
सावरा : येथील अंकुश गजानन कात्रे वय २२ वर्ष जन्मताच दोन्ही पाय व हातानी अपंग.वडिल वयाच्या ५ व्या वर्षी दुर्धर आजाराने मरण पावले घरची परिस्थिती एकदम हलाखीची मोल मजुरी उदरनिर्वाह करून जीवनाचा गाडा चालवत अंकुश च्या आई ने परिस्थिती वर मात करत त्याला वयाच्या ६ व्या वर्षी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेलं असता डॉक्टरांनी सांगितले हा मुलगा वाचू शकत नाही.पती मरण पावल्या नंतर सर्व जवाबदारी आई वर अली आई मोल मजुरी करत सतत संघर्ष करत जिद्द व चिकाटीच्या भरवश्यावर त्यानी अंकुशला जयपूर येथे विकलांग हॉस्पिटलमध्ये नेले त्या डॉक्टरांनी सुद्धा परिस्थिती पाहिल्यावर हा मुलगा वाचू शकतो पण बेड वरून कधीच उठुन बसु शकत नाही थोडा उपचार करून घरी पाठून दिले.पण “आई ही आईच असते तिची माया कोणत्याच परिस्थितीत कमी होत नाही” घरी आल्यावर पुन्हा न डगमगता निराश न होता नागपूर ला हॉस्टेल मध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आणि नागपूर गाठले तेथील शिक्षकांनी त्याला पाहून ठेवण्यास नकार दिला.की याच सर्व जागेवरच आहे आम्ही असे मुलं ठेवत नाही.तेथून घरी येऊन आता काय करायचे या चिंतेत कोणी काय सांगत होते कोणी काय नंतर एक वार्षिनी संपूर्ण माहिती काढून त्याला वर्धा इथं नेण्यात आले तिथं पण तेच अंकुश ला पाहून कोणीच त्याला ठेवायला तयार नव्हते असे करतात १३ वर्ष निगुण गेले आई पूर्ण थकली अंकुश मध्ये कोणताच बदल झाला नव्हता. १३ वर्ष बेडवरच पडून होता नंतर घरीच त्याला आईने उटणे बसने कसेतरी शिकवले असे करता करता २०१८ मध्ये त्याला येशु ख्रिस्त च्या हमे मध्ये घेऊन गेली तिथे त्याला डॉक्टरांनी सांगितले हा आता असाच राहू शकतो यामध्ये कोणताच बदलावं होऊ शकत नाही पण इच्छा शक्तीच्या जोरावर परिस्थिती वर मत करून येशू ख्रिस्त नच्या विचारातून साहित्यातून,विचारातून अंकुश मध्ये एक ऊर्जा प्राप्त होऊन अंकुश मध्ये बदल होत गेला तो स्वतः हा बेड वरून उठू लागला स्वतः हा ची कामे करू लागला अशिक्षित असूनही संपूर्ण बायबल पाठ करून येशू ख्रिस्तचा प्रसार करू लागला त्याला त्या मधून खूप प्रेरणा व ऊर्जा मिळाली असे तो सांगू लागला आणि आज अंकुश स्वतःहा येशू ख्रिस्त च्या बद्दल शेकडो लोकांना माहिती देत आहे. अंकुश च्या जीवन कार्यावरून असे स्पष्ट होते की या जगात कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते पण आत्मविश्वास आणि जिद्दीने चिकाटीने आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो.असे अंकुश ने देशोन्नती शी बोलताना सांगितले आणि बेरोजगार युकाना एक मोठा संदेश दिला.