कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : हिवळणी तलाव येथे आज जनावराचे लसीकरण करण्यात आले.आत्ता पावसाळा सुरु होत आहे आणी पावसाळ्यात गुरांना म्हशीना आणि शेळ्याना भरपूर आजार होतात आणि त्यांचमुळे काही जाणवरे दगवतात म्हणून आज हिवळणी येथील जनावराचे लसीकरण करण्यात आले. बैलाला शेतकरी सखा,सोबती सारखा जपतो व जीवापाड प्रेम करतो व त्याची काळजी राखतो त्यांना काही आजार येऊ नये प्रयत्न करतो परंतु त्यांना काही सोयी सुविधा उपलब्ध नसतात आणि शेतकऱ्यांना मोठया अडचणीचा सामना करावा लागतो परिणामी एखादा वेळेस दगवतो सुद्धा अशी परिस्थिती होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वी आज लसीकरण देण्यात आले या वेळी गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
किसनराव मस्के, किसन रामदास राठोड, रामराव देवला चव्हाण, श्री रमेश फुलसिंग राठोड, संजय मदन आडे, ग्रा प सदस्य तांडा सुधार, समिती जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी हाके तसेच लसीकरण अभियाना करिता खालील अधिकारी उपस्थित होते.थोरात पशुवैद्यकीय अधिकारी गजानन राठोड, पशुवैद्यकीय परिचर तोरकड पशुवैद्यकीय परिचर श्री बंदुके पशुवैद्यकीय परिचर.इत्यादीं कर्मचारी अधिकारी प्रामुख्याने उपस्थिती होती.