संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डी येथील उद्योगपती संजय नारायण जाधव यांनी देऊळगाव बोरीबेल रस्त्यावरून हिंगणीबेर्डी कडे जाणाऱ्या रस्त्यावरती स्वखर्चातून भव्यदिव्य अशी कमान उभारली आहे.
खडकी लोणारवाडी जोतिबानगर हिंगणीबेर्डी आश्या मोठया मार्गांचे सध्या काम प्रगतीपथावर असून या फाट्यापासून ते हिंगणीबेर्डी गावापर्यंत असणारा रस्ताही आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नामुळे मंजूर आहे.परंतु या हिंगणीबेर्डी गावाला दिशादर्शक असे काहीच नव्हते. यापूर्वी या ठिकाणची पाणी पुरवठा टाकी ही ओळख या फाट्याची होती काही कालांतराने ही टाकीही पडल्यामुळे लोक या ठिकाणा उल्लेख पडलेली टाकी असा होऊ लागला. त्यामुळे जाधव कुटुंबीयाना या ठिकाणची आगळीवेगळी असणारी ओळख पुसण्यासाठी त्यानी निर्धार केला व स्व.आमदार सुभाष अण्णा कुल या नावाने भव्य दिव्य अशी नेत्रदीपक कमान उभारली.जाधव कुटुंबीय हे नेहमीच समाजकार्यात कायमच आग्रेसर असते त्यांनी याआधी गावातील दोन समाजमंदिरे ही स्वखर्चने उभारली आहेत.त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे
सुमन नारायण उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संजय जाधव हे गावात नेहमीच ते समाजकार्य करीत आसतात त्यांनी उभारलेल्या कमानीमुळे प्रवाशाना हे गाव माहीत होण्यास मदत होणार असून या कमानीमुळे आमच्या गावची शोभा वाढण्यास मदत होणार आहे.आम्ही ग्रामस्थांच्या वतीने संजय जाधव यांचे आभार व्यक्त करतो.
-गौतम बरडे,शेतकरी