अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव – उत्तम आरोग्यासाठी योगशास्त्र या विषयावर भारतीय स्टेट बँक ग्रामीण ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र वाशिम येथे शिवणकाम महिला प्रशिक्षण मार्गदर्शन करताना माननीय डॉ सिध्दार्थ देवळे सर एम डी (न्युरालाॅजी ) वाशिम यांनी जागतिक योग दिनाच्या पूर्वसंध्येला रुरल स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ मध्ये चालत असलेल्या विविध प्रशिक्षणा पैकी निवासी सुरू असलेल्या शिवणकाम करणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील मुली व महिलांना आपल्या आरोग्याविषयी आहार,विहार,निद्रा आणि उत्तम आरोग्य हीच आयुष्याची खरी गुरुकुल्ली आहे. ‘आरोग्यमं धनसंपदा’! तसेच आरोग्याचा मूलमंत्र डॉ. देवळे साहेबांनी प्रशिक्षणार्थ्यांची हितगुज साधताना दिला.सदर संस्थेमध्ये चालणाऱ्या प्रशिक्षणाची इथंभूत माहिती करून घेतली. आदरणीय संचालक रघुनाथ माने सर यांचे भरभरून कौतुक केले. आदरणीय माने सरांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील युवकांना रोजगार ची उत्तर उत्तर प्रगती होत आहे असे सूचक विधान डॉक्टर देवळे साहेबांनी या मार्गदर्शनातून व्यक्त केले. या प्रशिक्षणा व्यतिरिक्त महिलांसाठी ब्युटी पार्लर,शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, केक व बेकरी ,फास्ट फूड , जुडबॅक.व पुरुषांसाठी टू व्हीलर दुरुस्ती,मोबाईल दुरुस्ती, फोटोग्राफी व्हिडिओ ग्राफी,दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कुक्कुटपालन,मत्स्य व्यवसाय, मधुमक्खी पालन, उद्योजकता कौशल्य विकास या प्रशिक्षणाचा ग्रामीण भागातील 18 ते 45 वयोगटातील महिला पुरुष यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण भागातील युवकांना रोजगार या संस्थेचे संचालक माननीय रघुनाथ माने सर यांनी केले आहे. हे सर्व प्रशिक्षण मोफत व निवासी असून शिक्षणा दरम्यान लागणारे साहित्य प्रशिक्षणार्थ्यांना दिले जाते तीन वेळा चहा,नाश्ता आणि दोन वेळा जेवन तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणी खाली सर्व परिसर असून प्रशिक्षणार्थ्यांची काळजी घेतली जाते तरी याचा लाभ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी घ्यावा असे सूचक विधान डॉक्टर सिद्धार्थ देवळे साहेब यांनी केले आहे.