विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर: तालुक्यातील डिकसळ येथील शाळेतील एका शिक्षकाच्या बदलीनंतर निरोप समारंभाच्या कार्यकामात सहशिक्षिकेसह ग्रामस्थ व विद्यार्थी भावुक झाल्याचे पहावयास मिळाले. देवानंद भानुदास शेलार असे या शिक्षकांचे नाव असून गेल्या तेरा वर्षांपूर्वी ते इंदापूर तालुक्यातील डिकसळ या जि. प. शाळेत शाळेत रुजू झाले होते. नंतरच्या काळात त्यांची मुख्याध्यापक या पदावर बढती झाली होती. तेरा वर्षाच्या आपल्या प्रदीर्घ सेवेच्या काळात त्यांनी अध्यापन करत असताना शाळेच्या भिंती बोलक्या केल्या होत्या. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्व शिक्षण देत असतानाच गावामध्ये सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची नुकतीच बदली होऊन तक्रारवाडी या केंद्रशाळेत ते रुजू होणार आहेत. त्यापूर्वी शनिवार दिनांक २४ जुन रोजी त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांनी व शाळा व्यवस्थापक समितीने केले होते. यावेळी त्यांच्या आठवणी सांगत असताना ग्रामस्थ तसेच त्यांच्याबरोबर उप शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या शिक्षक भगिनी सुरेखा वाघ यांना आपले अश्रू आनावर झाले. यावेळी केंद्रप्रमुख हनुमंत शिंदे यांची केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे मा.सभापती शिवदास सूर्यवंशी, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे विद्यमान संचालक व या शाळेत नुकतेच मुख्याध्यापक या पदावर रुजू झालेले सतिश दराडे, गावच्या प्रथम नागरिक सरपंच मनीषा गवळी, उपसरपंच संदीप भोंग आदि मान्यवर ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सरपंच मनीषा गवळी यांनी शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सूत्रसंचालन सतिश दराडे यांनी प्रास्ताविक केंद्रप्रमुख हनुमंत शिंदे यांनी केले तर आभार उपशिक्षिका सुरेखा वाघ यांनी मानले.


