सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : लोणच म्हटलं कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते, मग आंबा असो वा लिंबू, मुळा, मिरची, अशी लोणची वर्षभरासाठी उन्हाळ्याच्या शेवटी घरोघरी तयार केली जातात. ती बनविण्यासाठी हिंगाचा वापर आवर्जून केला जातो. कारण हिंग ही लोणची वर्षभर टिकविण्याचे काम करते. मात्र, या हिंगाचा प्रतिकिलोचा दर यंदा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. त्यामुळे लोणचे तयार करण्यापेक्षा ते विकत घेतलेलेच बरे, असा सूर महिला वर्गाकडून निघत आहे.हिंग नियमित डाळ आमटीमध्ये हिंग फोडणीसाठी वापरला जातो. एखादा पदार्थ जास्त काळ टिकावा याकरिता त्याचा वापर केला जातो.मागील वर्षी हिंग ३८० ते ४०० रुपये प्रतिकिलो असा दर होता.उत्पादन व पुरवठा कमी असल्याने दरातही १०० रुपयांनी वाढ झाली आहे.
-जिरेही वाढले
प्रति किलोचा दर ५९० वर पोहोचला आहे. यापूर्वी ४०० ते ४५० रुपये किलो असा दर होता.
- मसाले किलोचे दर
लवंग ११५०,दालचिनी ३६०,जायपत्री २२०० ,खसखस- १४०० ,तीळ २००,मोहरी- ९० कोट
यंदा हिंग, जिऱ्याचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा झाल्यामुळे वर्षभराची लोणची घालणे आता परवडत नाही. त्यापेक्षा विकतचे घेतलेले बरे – प्रियंका बाबा बारहाटे ( गृहिणी )
हिंगाचे उत्पादन कमी झाल्याने मागील वर्षीपासून हिंगाचा दर चढाच आहे. जिऱ्याचे मागील वर्षी आवक कमी झाला परिणामी दर चढेच राहिले आहेत.
• मुन्ना रेहीदासनी ( मसाला व्यापारी )