रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : .भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा ‘एक देशमे दो विधान,दो प्रधान,दो निशान नही चलेंगे’ हा नारा देणारे डाँ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिवस तेल्हारा तालुका व शहर भाजपाच्या वतिने दि.२३ जुन साजरा करण्यात येवून त्यांच्या स्मृतिला उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले.
तेल्हारा शहर भाजपाध्यक्ष महेंद्र गोयनका यांच्या निवास्थानी पार पडलेल्या डाँ.श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिनानिमित्य त्यांच्या प्रतिमेचे प्रारंभी पुजन,दीपप्रज्वलन व हारार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड,शहरध्यक्ष महेंद्र गोयनका,उपाध्यक्ष बालु पवार, विजय देशमुख, भाजयुमो शहरध्यक्ष गणेश इंगोले, राहूल झापर्डे,कमल बायाड,रवि शर्मा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.डाँ. श्यामाप्रसाद मुखर्जी-अमर रहे,अमर रहे,भारत माता कि जय-जय च्या जयजय कारानंतर उपस्थितांनी डाँ.मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन श्रध्दापूर्वक अभिवादन केले.