विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटनाचे प्रमाण वाढले आहे. किनवट तालुक्यातील शिवनी- आप्पाराव पेठ येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर 10/15 च्या जमावाने कसायांनी कट रचून रात्री निंदनीय हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आज हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी शिवणी गावात कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन प्रसासनाकडून कडक कार्यवाही होण्याबाबत अश्वासन दिले आणि सदैव सोबत असल्याचा धीर दिला.शासनाने किनवट तालुक्यातील घटनेची गंभीर दखल घेऊन हल्ला करणाऱ्या गुंडांना ताब्यात घेऊन कडक कारवाई करण्याची मागणीहि केली आहे.सायंकाळी इस्लापूर पोलीस स्टेशन येथे भेट देऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री रावसाहेब धरणे यांच्यासोबत पुढील कार्यवाही बाबत चर्चा केली.यावेळी विश्व हिंदू प्रांत मंत्री कृष्णाजी देशमुख किनवट तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे हिमायतनगर तालुका अध्यक्ष आशिष सकवाण बालाजी आलेवार रामभाऊ सूर्यवंशी प्रकाशजी कोंडूळवार सदाशिवजी दुताटे गजानन पांचाळ प्रांत सह संयोजक बजरंग दल गणेश यशवंतकर गजानन पांचाळअवि दुबूकवाड इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.