संभाजी शिवाजी उघडे
ग्रामीण प्रतिनिधी पाथर्डी
पाथर्डी :- आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला यशस्वीरीत्या ९ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मोदी 9 या अभियानांतर्गत आज भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमादरम्यान कासारपिंपळगाव,हनुमान टाकळी, साकेगाव,डांगेवाडी येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वारियर्स शाखेचे उद्घाटन शेवगाव पाथर्डी च्या कर्तव्यनिष्ठ आमदार मोनिका राजीव राजळे यांनी केले.या नवीन शाखा व त्याचे युवा कार्यकर्ते जनसेवेचे कार्य अविरत पणे करत राहतील याची खात्री आहे.पाथर्डी तालुका युवा मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेल्या या भव्य रॅलीचा समारोप पाथर्डी येथे करण्यात आला.यावेळी श्री.अंकित संचिती,अहमदनगर जिल्हा प्रभारी युवा मोर्चा,सत्यजीत कदम,जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा, कुशल भापसे,महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा सचिव,अरुण मुंडे,भाजपा जिल्हाध्यक्ष,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, सचिन वायकर तसेच तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी,पाथर्डी तालुका युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



