बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये कला महाविद्यालय व पतंजली आरोग्य केंद्राचे रणजीत बजार यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. बुधवार दिनांक 21 सकाळी सहा ते साडेसात या वेळेत बारामतीतून योगशिक्षिका सौ सोनाली ठवरे, व निलिमा झारगड यांनी योगाचे धडे दिले भिगवन मधील स्टेप डान्स स्टुडिओचे संचालक नितीन सोनवणे यांनी योगा झुम्बा डान्स चे प्रशिक्षण दिले. अनेक ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. आरोग्य जपण्यासाठी रोज एक तास योगा करावा असे सोनाली ठवरे यांनी सांगितले या कार्यक्रमाला भिगवण मेडिकल्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संकेत मोरे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रियाज शेख, संजय चौधरी ,दिनानाथ मारणे, डॉक्टर अस्मिता भरणे ,डॉक्टर स्मिता खानवरे ,आशा चौधरी व समस्त महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन पतंजली आरोग्य केंद्राचे संचालक श्री रणजीत भोंगळे व भिगवन कला महाविद्यालयाच्या वतीने महादेव वाळुंज, प्राचार्य पद्माकर गाडेकर यांनी केले होते.


