भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव : आव्हाणे बुद्रुक येथील प्रसिद्ध व्यवसायिक व सामाजिक कार्य करणारे व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती दूत म्हणून काम करणारे दत्तात्रय भालेराव यांना समर्थ सोशल फाउंडेशन व जनरल हॉस्पिटल व न्यूट्रीफील हेल्थ प्रोडक्ट प्रा.ली. कोल्हापूर या संस्थेच्या माध्यमातून दिला जाणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती,मधुमेहमुक्ती,रोगमुक्ती, वेदनामुक्ती आणि शिशुरक्षा हे अभियान राबवले जात आहेत.या अभियान अंतर्गत दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार 2023 श्री.दत्तात्रय भानुदास भालेराव रा.बऱ्हाणपूर तालुका शेवगाव यांना जाहीर करण्यात आला आहे.समर्थ सोशल फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती असणाऱ्या लोकांना योग्य ते मार्गदर्शन करून होणाऱ्या त्रासातून बाहेर पडण्यासाठीचे काम केले जाते.अशा प्रकारे राज्यात शेकडो केंद्रधारक काम करतात त्यापैकी ज्या केंद्रधारकाचे काम उत्कृष्ट अशा पद्धतीचे आहे. त्या केंद्रधारकाचा संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन उचित सन्मान केला जातो. प्रत्येक कुटूंबातील लाखो लोकांना प्रबोधन करून व्यसनमुक्ती मधुमेहमुक्तीसाठी प्रयत्न करून अनेक लोकांना कुटुंबांना आधार,उभारणी,नवसंजीवनी देऊन समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या केंद्र धारकाचा 25 जून 2023 रोजी कोल्हापूर या ठिकाणी भव्य राज्यस्तरीय पुरस्कार देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. राज्यस्तरीय व्यसनमुक्ती,मधुमेहमुक्ती दुत पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.दत्तात्रय भालेराव यांचे विविध सामाजिक राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.