बंकटी हजारे
तालुका प्रतिनिधी माजलगाव
माजलगांव : तालुक्यातील पवारवाडी येथे शेतीसाठी पाटाला ( कॅनॉलद्वारे ) पाणी सोडणे या प्रमुख मागणीसाठी शिवसेना नेते आप्पासाहेब जाधव यांच्या कडून भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यावर्षी पाऊस लांबणीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांचे उसाचे पिक उन्हामुळे वाळुन जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीसाठी कॅनालद्वारे माजलगाव धरणातील पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावे. यासाठी शुक्रवार दि . २३/०६/२०२३ रोजी (माजलगांव – परभणी ) नॅशनल हायवे रोड पवारवाडी (देवकृपा नगर ) येथे सकाळी ११:०० वाजता माजलगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही तीव्र स्वरुपात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी रस्ता रोको मुळे वाहतूकीस मोठी कोंडी निर्माण झाली होती. या रस्ता रोको आंदोलनात शिवसेनेचे नेते आप्पासाहेब जाधव यांच्या सह शेकडो शेतकरी वर्ग उपस्थित होता.


