अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव : सध्या राज्यभरात महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून दी 23 जून रोजी मेडशी ग्रामपंचायत येथे हा कार्यक्रम पार पडला.शासन आपल्या दारी कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमित झनक हे होते.तर प्रमुख उपस्थितीत मालेगाव तहसीलदार दीपक पुंड,नायब तहसीलदार रवींद्र भाबड,सरपंच शेख जमिर, जि प सदस्य सौ लक्ष्मीताई तायडे, पं स सदस्य कौशल्यबाई साठे, कृ.उ.बा. सभापती गणेश भाऊ उडाळ माजी सभापती शेख गनीभाई माजी सरपंच सुभाष मंत्री, पोलिस पाटिल सौ अनिता चोथमल,सौ प्रियाताई पाठक मा प स सद्स गजानन शिंदे, प्रदीप तायडे, ज्ञानेश्वर मुंडे शिवसेना उपतालुकाप्रमुख विलास जाधव शिवसेना तालुकाप्रमुख ह भ प मंगेश महाराज घुगे.जिल्हा उपप्रमुख शिवसेना तसेच मालेगाव कृषी विभागाचे अधिकारी,महावितरण कार्यालयाचे कर्मचारी, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी,आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पशू वैद्यकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी मेडशी ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका,अंगणवाडी सेविका,मेडशी मंडळातील महसूल कर्मचारी होते.यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी तहसीलदार दीपक पुंड यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली.प्रशासनाकडून जनतेच्या सर्व समस्यांचा निपटारा करण्यासाठी कर्मचारी व अधिकारी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यां व लोक प्रतिनिधी समोर सर्व सामान्य जनतेच्या विविध समस्या मांडल्या यामध्ये पी एम किसान योजनेची के वाय सी ,नवीन खाते करणे,अपंग,विधवा,श्रावण बाळ,घरकुल, नवीन फाईल निकाली लावणे,विविध मुद्यांचा समावेश होता.यावर समाधानकारक उत्तर व अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश देण्याचे आश्वासन अधिकारी वर्गानी दिले.कार्यक्रम यशस्वी करण्या साठी ग्राम पंचायत कर्मचारी वर्गानी परिश्रम घेतले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास ढाले यांनी केले तर आभार प्रदर्शन शेख जावेद यांनी केल. या कार्यक्रमाला मेडशी परिसरातील लोकांची खूप मोठी गर्दी जमली होती.