विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर:११७ टीएमसी भरलेले उजनी धरण पाणी वाटपाचे योग्य नियोजन न केल्यामुळे मायनस २८ टक्क्यावर जाऊन पोहचले आहे ऊस पिकास कितीही पाणी दिले तरी वारे व उष्णतेमुळे पीक लगेच सुकत आहे. गेल्या वर्षी २९ मे ला महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सूनचा पाऊस २३ जून तारीख आली तरी अजून यायचे नाव घेत नाही. उजनी पाणलोट पट्ट्यात जोरदार वारे सुटले असून अगोदरच ऊन व उष्णता यामुळे शेतीतील ओल लवकरच उडत आहे. त्यात विजेचे लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे लोड शेडिंगमुळे पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. पर्यायाने लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी उभे केलेली पिके वाळू लागली आहे. उजनीची पाणीपातळी वरचेवर कमी होऊ लागल्याने पाण्यात टाकलेल्या पाईप उघड्या पडल्या आहेत. तरीही शेतकरी जर खोदून पाणी मूळ पाईपलांच्या ठिकाणी येईल असे प्रयत्न करत आहे. तर काही शेतकरी पाईप वाढवून पाण्याच्या मूळ पात्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. पाऊसाने लांबवर हुलकावणी दिल्याने वाढवलेले पिक पूर्णता जळुन गेली आहेत.











