शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोसिएशन या संघटनेशी संलग्न आहेत यामुळे महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोसिएशन यांनी महाराष्ट्र स्तरावर घेतलेले निर्णय आमचे वर बंधनकारक राहतील इंग्रजी माध्यमांच्या शाळांना RTE अंतर्गत दुर्बल व वंचीत घटकातील विद्यार्थ्यांना 25% मोफत प्रवेश देण्यात येतो. परंतु शासनाव्दारे दिला जाणारा सन 2019-20 पासुनचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. या निधी अभावी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या आहेत शाळांना यापूर्वी वितरीत करण्यात आलेल्या निधि कोणताही तपशिल अतापर्यंत शाळांना शिक्षण विभागामार्फत देण्यात आलेला नाही त्यामुळे सन 2019-2020 पासुनचा RTE 25% चा निधी शासनस्तरावर प्रयत्न करून दि. 29/6/2023 पर्यंत मिळवून देण्याची कृपा करावी अन्यथा आम्हाला उपोषणाचा मार्ग निवडावा लागेल असे बोलताना संस्थेचे अध्यक्ष संतोषजी जैन सर यांनी व्यक्त केले त्यामुळे
इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आवश्यक नसणारी व लागू नसणारी माहिती मागविण्यात येते शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचारी यांचा यात बराच वेळ जातो याशिवाय एकाच प्रकारची माहिती वारंवार मागितली त्यामुळे शाळेचा श्रम व वेळ वाया जातो तरी वरिष्ठांनी आवश्यक तीच माहिती या इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून घेत जावी. काही पालक हेतुपुरस्परपणे शाळांची फि थकवितात व शाळांना तक्रार करण्याचा ईशारा देवुन आपल्या कार्यालयाची भिती दाखवितात. इंग्रजी माध्यमांच्या शाळा ह्या कायम विना अनुदानीत अथवा स्वंय अर्थसहाय्यीत तत्वावर चालविण्यात येतात. त्यामुळे शाळा चालविण्यासाठी शिक्षण शुल्क हा एकमेव मार्ग आहे. तरी आपल्या स्तरावरुन पालकांना शाळेचे शैक्षणिक शुल्क न भरता टि.सी. देण्यावाबत सक्ती न करणे हा प्रकार खेदजनक असल्याच्या प्रतिक्रीया शिष्ट मंळाने व्यक्त केल्या यावेळी इंग्रजी माध्यमांचे असलेल्या मेस्टा या संस्थेचे अध्यक्ष अजय झरकर,अडवोकेट संतोषजी जैन , अविनाश पोंगाणे , दर्शन अग्रवाल ,राजेश देशपांडे , भारत कुलकर्णी , विजया ठाकरे , मनीषा फुलेवार ,संतोष माहेश्वरी , गंगासागर सर ,भगवान अग्रवाल,वासिम अहेमद , व सर्व शिक्षक शिक्षिका व संचालक मंडळींनी पंचायत समिती शिक्षण विभागाचे पांडुरंग खंडारे व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमोल चव्हाण
यांना निवेदन दिले