सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड: दि. २२ जून २०२३ बीड जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष चालू होताच जिल्ह्यातील अनेक शाळांन. जनतेने आणि स्थानिकच्या नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना कुलूप ठोकले प्रकार उघडकीस येत त आहेत शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थी मोठ्या आनंदाने शाळेत जाताना दिसतात.परंतू बीड जिल्ह्यातील घटना पाहता मात्र जिल्ह्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा ढासळताना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी टाळे ठोकण्याचा घटना समोर येत असून जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी साहेब यांनी या शांळाकडे जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. जिल्ह्यात अनेक जिल्हा परिषद शाळेच्या इमारती मोडकळीस आलेल्या दिसत आहेत. या प्रकारामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तर काही शाळांमध्ये शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती पाहता आजही येथील शाळा शिक्षकांशिवाय बेवारस पडलेल्या दिसतात इयत्ता पहिली ते चौथी या वर्गासाठी एक शिक्षक तर इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गासाठी एक शिक्षक अशा पध्दतीने दोन शिक्षकांवर शाळा चालवली जाते यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होताना दिसते अनेक म्हणण्यापेक्षा १०० % जिल्हा परिषद शाळां पैकी ७०% शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शौचालय नाहीत आणि आहेत तर ती दैनिक अवस्थेत त्यामुळे शाळेत शिकण्यासाठी येणाऱ्या मुली शाळेत जाण्यासाठी नकार देतात. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या शालेय योजना शाळेत न राबवता त्या परिसरातील एखाद्या राजकीय नेत्यांच्या घरी राबवल्या जातात शालेय विद्यार्थ्यांना मिळणारा पोषक आहार नक्की विद्यार्थ्यांना मिळतो का याची तपासणी शाळेत येवून न करता वरिष्ठ अधिकारी कार्यालयात बसुन करतात.अशा अनेक घटना किंवा प्रकार शासनाकडून होताना दिसतात. तेव्हा महाराष्ट्र शिक्षण मंडळाने जिल्हा परिषद शाळेतील उणीवा भरून काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कार्यालयात बसून कागदावर सह्या केल्याने जिल्हा परिषद शाळांचा आणि शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढत नाही तर जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग शिक्षण मंत्री आणि जिल्ह्यातील गट शिक्षण अधिकारी तथा या विभागातील सर्व कनिष्ठ,वरिष्ठ अधिकार तथा कर्मचारी यांनी ग्रामीण भागातील लोकांशी संपर्क साधला पाहिजे शाळेच्या बाबतीत आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या अडचणी बाबतीत चर्चा केली पाहिजे ज्या शाळेत शिक्षक संख्या कमी आहे. त्या शाळेत त्वरीत शिक्षक भरती प्रक्रिया करणे तरच जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना थांबतील अन्यथा बीड जिल्ह्यातील नागरिक प्रत्येक जिल्हा परिषद शाळे कुलूप ठोकल्यशिवाय राहणार नाहीत तेव्हा जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी साहेब कार्यालयात बसून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढत नसतो हे लक्षात ठेवा.


