दिपक मसुरकर
तालुका प्रतिनिधी रिसोड
रिसोड:दि.22/06/2023 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सुविदे फाऊंडेशन कृषि महाविद्यालय रिसोड मध्ये कृषि अभ्यासक्रम कृषि अभियांत्रिकी नाविन्यतम तांत्रीक प्रायोगिक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग मधून कार्यरत आहेत. अभ्यास म्हणजे परीक्षा अभ्यास म्हणजे होमवर्क हेच समीकरण बहुतांश विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडले असते. मात्र कृषी महाविद्यालय रिसोड जिल्हा वाशिम चे विद्यार्थी याला अपवाद ठरत आहेत. कृषी चे शिक्षण घेत असताना प्रत्यक्ष शेतात राबून प्रयोग करून आणि आजूबाजूच्या वातावरणाशी समरस होत हे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध होत आहेत. याच कृतीला आधारित शिक्षणामुळे संपूर्ण ग्रामीण पार्श्वभूमीचे हे विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांशी तोडीस तोड स्पर्धा आता करू लागले आहेत.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका करडा येथे कृषी महाविद्यालय मध्ये चालविण्यात येते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्याची संकल्पना येथे राबविली जाते. कृतीआधारित शिक्षण पद्धतीतून शिकलेले हे विद्यार्थी आता त्या अनुभवाच्या आधारे वैज्ञानिक मॉडेल्स बनवू लागले आहेत.कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कृषी अभियांत्रिकी विभागाअंतर्गत शाश्वत शेती करायला लावने, कंटूर बांध मृदासंवर्धन पाणीसंवर्धन सोलर ड्रायर सोलर लाईट इनसेक्ट ट्रॅप सोलर पथदिवे तसेच शेती मध्ये वापरण्यात येणारे विविध कृषी यंत्र स्वतः हाताने बनून त्या वर प्रात्यक्षित घेत आहे अशी कामे हे विद्यार्थी प्रत्यक्ष कामातून शिकतात. या अनुभवातून ते निरीक्षणही करतात. अशा शिकण्यातून त्यांची समज विकसित होत जाते. फिजिक्स विज्ञानानामधील विषय ते शेतात आणि निसर्गात शिकतात. पारंपरिक ज्ञानाला वैज्ञानिक शिक्षणाची जोड देताना. त्यामुळे थिअरीमध्ये विषय शिकण्याआधी मुले प्रत्यक्ष अनुभवातून ते शिकतात. जे काम त्यांनी अगोदरच केले असते त्यांच्याशी संबंधित वैज्ञानिक संकल्पना आणि नावे सांगितली की त्यांना लवकर समजतात. याच पद्धतीने शिकत विद्यार्थ्यांनी स्वत:चे वैज्ञानिक मॉडेल्स विकसित केले आहेत. जसे की कमी किमतीच्या नैसर्गिक वायू संचलित व छत विस्थापित शेडनेट ग्रीन हाऊसचे बांधकाम सहाव्या संत्रातील विद्यार्थ्यांनी स्वकष्टातून केले आहे तर त्या मध्ये मिरची टोमॅटो, काकडी आणि इतर भाजीपाला पिकांचे उत्पादन स्वतः घेत आहे तसेच सोलार इनसेक्ट ट्रॅप आणि सोलर ड्रायर चौथ्या संत्रातील विद्यार्थ्यांनि स्वतः बनून त्या मध्ये मनुका आमचूर आणि कढीपत्ता पावडर असे विविध पदार्थाचे पॅकिंग लेबलिंग आणि विक्री ही विद्यार्थ्यांनी स्वतः करून नफा तयार केला आहे. हे मॉडेल्स ते तयार करून सादर सुद्धा करतात. प्रत्यक्ष काम केले असल्याने त्यांना मॉडेल्सची व्यवस्थित माहिती देणेही सहज जमते. त्यामुळे आता शहरी मुलांशी आणि इतर विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत आहेत हे सर्व प्रकल्प आणि यंत्र तयार करण्यासाठी कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक मनोज वि जाधव यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रकल्प सादर करताना प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल याचा मेळ म्हणजेच प्रकल्प असल्याच्या भावना महाविद्यालयाचे तांत्रिक समन्वयक श्री राजेश डवरे यांनी व्यक्त केली व विद्यार्थ्यांनी शेतीसाठी केलेले प्रकल्प व विविध यंत्राच्या निर्मिती बद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आशिष अप्तुरकर यांनी केले आहे. याप्रसंगी कृषि महाविद्यालय रिसोड येथील उपप्राचार्य डॉ पिजी देव्हडे राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी दिपक मसुरकर सहा प्रा तथा संपूर्ण कर्मचारी वृंद यांचे सहकार्य मोलाचे ठरले.











