निशांत सोनटक्के
शहर प्रतिनिधी पांढरकवडा
पांढरकवडा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व तालुका क्रीडा संकुल पांढरकवडा तसेच गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल व मित्र क्रीडा मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तालुका क्रीडा संकुल पांढरकवडा च्या भव्य मैदानावर योग दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी योग प्रशिक्षक राजेंद्र पितलिया, विकास ताटकुंडवार, शेटे साहेब, तालुका क्रीडा सचिव सुनील कोपुलवार शाळेचे संचालक मदन जिड्डेवार, शाळेचे प्राचार्य स्वप्निल कुळकर्णी, उपप्राचार्य अमित काळे शाळेचे सर्व शिक्षक तसेच मित्र क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पितलिया सर विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देतांना योग हे निरोगी जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे प्रतिपादन केले तसेच सर्वांनी दररोज योग करावा असे आवाहन केले.यावेळी मदन जिड्डेवार यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल कोपुलवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व क्रीडा व योगप्रेमींनी अथक परिश्रम घेतले.