मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी.आज दि.21 जून 2023 सिनेमॅटिक नाटक तू तू मी मी या नाटकाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध सिने अभिनेता भरत जाधव हे परळी शहरात आले असता त्यांनी परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेले प्रभू श्री वैद्यनाथचे दर्शन घेतले. यावेळी श्री वैद्यनाथ देवस्थान कमिटीचे विश्वस्त श्री राजेश देशमुख यांनी त्यांचे पुष्पहार व श्री प्रभू वैद्यनाथ ची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त बाबुराव मेनकुदळे तसेच बंसल क्लासेस चे महाराष्ट्राचे प्रमुख चंदुलाल बियाणे उपस्थित होते.


