रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
बुलढाणा अर्बन येथे मागील सात वर्षांपासून सहाय्यक शाखा व्यवस्थापक या पदावर हिवरखेड वासियांना अविरत सेवा देणारे श्री.रविकांत पालखडे साहेब यांना निरोप देण्यात आला. आयोजित निरोप समारंभात श्री. रविकांत पालखडे यांची अकोट येथे बदली झाल्यामुळे त्यांना शाल ,श्रीफळ व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी बुलढाणा अर्बन तेल्हारा येथील शाखा व्यवस्थापक रामदास भालेराव, हिवरखेड शाखेचे शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर चोपडे जिल्हा परिषद हिवरखेड येथील शिक्षक गोपाल गि-हे सर तसेच शाखा हिवरखेड येथील कर्मचारी नितीन बावणे, विकास जाने, रुपेश यादव, प्रीती गि-हे मॅडम ,शुभम टवलकार, यशवंत खारोडे, अरुण सेगर, नरेश जयस्वाल, विनोद तळोकार तसेच अल्पबचत प्रतिनिधी जितेश कारिया, विनोद अग्रवाल, दीपक राऊत आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.


