विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
पोखरी सारख्या अतिशय दुर्गम भागात तांड्यावरील बंजारा समाजातील कु वैष्णवी रोहिदास राठोड या विद्यार्थिनीने वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेमध्ये 720 गुणांपैकी 700 गुण घेऊन महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये मिळवलेल्या अभूतपूर्व यशामुळे देशाभरात आपल्या गावाचा व तालुक्याचा नावलौकिक केले संपूर्ण देशाभरातून राज्य जिल्ह्यात तालुक्यात व गावातून कौतुकाचा वर्षाव तिच्यावर होत आहे.संपूर्ण बंजारा समाजाला हेवा वाटावा असे यश कुमारी वैष्णवी राठोड पोखरी (तांडा) ता. महागाव जिल्हा यवतमाळ येथील बंजारा तरुणीने संपादन केले आहे. खरोखरच या यशावरून असे लक्षात येते की आज शैक्षणिक क्षेत्रात असो अथवा इतर क्षेत्रात बंजारा समाजातील मुलीसुद्धा कठोर परिश्रम घेऊन शिक्षणामध्ये अशा प्रकारचा ठसा उमटवीत आहे. ही बाब तमाम बंजारा समाजाकरिता अभिमानाची आहे. कु. वैष्णवी राठोड यांना संपादन केलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक करण्यासाठी त्याला शुभेच्छा देण्यासाठी आज मी स्वतः पोखरी या गावाला भेट देऊन वैष्णवी यास शुभेच्छा देऊन त्याचे कौतुक केले या यशाच्या पाठीमागे तिच्या आईचे कष्ट व त्यांचे मामा श्री शंकर जाधव सेवानिवृत्त अभियंता नारायण जाधव यांचे मार्गदर्शन उच्च मूल्याचे संस्कार दिल्यामुळे ही यशाची पायरी वैष्णवी राठोड यांनी गाठली वैष्णवी राठोड यांचे मामा नारायण जाधव अभियंता वीज वितरण उपविभागीय कार्यालय पुसद हा माझा वर्गमित्र व आमची भावकी वैष्णवी यांच्या वडीलाचे निधन बारा वर्षांपूर्वी एका अपघातात झाले अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकीकडे डोळ्याच्या पापणीत अश्रू असताना दुसरीकडे आपल्या भविष्यासाठी घेतलेली उंच भरारी ही वाखण्याजोगी व इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी अशीही वैष्णवी ची वाटचाल मनाला थक्क करणारी आहे प्रत्येकांना सार्थ अभिमान वाटावा अशा या त्याच्या यशाबद्दल व पुढील त्यांच्या जीवनामध्ये अनेक मोठे यश संपादन करोत अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा कु वैष्णवी राठोड यांनी संपादन केले .