अजिज खान
शहर प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी : दि.९/६/२०२३ शुक्रवार रोजी प्रभाग क्र १६ येथे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या फलकाचे अनावरण ढाणकी नगर अध्यक्ष सुरेश जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. अग्नि व पृथ्वी सारख्या मिसाईल ची निर्मिती मध्ये महत्वपूर्ण योगदान देऊन त्यांनी हे काम पूर्ण केले. ते भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून उत्कृष्ट रित्या काम पाहिले.भारताच्या जडण घडणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.असे प्रतिपादन नगर अध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी यावेळी केले. डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अमर रहे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. फलकाचे अनावरण करण्यात आले त्यावेळी नगर अध्यक्ष सुरेश जयस्वाल,उपनगर अध्यक्ष जहिर जमीनदार,शे. इरफान शेख मस्तान नगर सेवक, सुकृत नगरसेवक बाळासाहेब गंदेवार,शेख,बशीर शे.लाल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ढाणकी शहर अध्यक्ष बंटी जाधव,वानखेडे साहेब,डॉ.कवडे,शे.अनिस,शे.अहमद,साहेबराव वाघमोडे,पत्रकार इरफान,सुनील मांजरे ,दिगांबर शिरडकर, आदी उपस्थित होते.