मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे कार्यालय येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा.श्री. शरदचंद्र पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्याबद्दल शिंदे – भाजप सरकार विरोधात व गृहमंत्री विरोधात घोषणा करण्यात आल्या. जिल्हाभर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे धमकी देणा-याप्रती रोष व्यक्त करण्यात येत आहे. या व्यक्तीला त्वरीत अटक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच वाचाळविर निलेश राणे यांनी शरद पवार साहेबांबद्दल चुकीचे विधान केल्याबद्दल निलेश राणे यांचा निषेध करण्यात आला व यांनाही अटक करण्याची मागणी करण्यात आली. यांना अटक न झाल्यास संपूर्ण जिल्हयात तिम्र आंदोलन करण्यात येईल. अशाप्रकारचा ईशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे देण्यात आला. याप्रसंगी उपस्थितामध्ये भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव श्री. धनंजय दलाल, महिला जिल्हाध्यक्षा सौ. सरीताताई मदनकर, युवकचे अध्यक्ष यशवंत सोनकुसरे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, डॉ. श्रीकांत वैरागडे, डॉ. रविंद्र वानखेडे, अॅड. विनयमोहन पशिने, प्रा. नारायणसिंह राजपूत, नरेंद्र झझाड, हेमंत महाकाळकर, स्वप्निल नशिने, पं.स. सभापती सौ. रत्नमाला चेटूले, सौ. नंदा झंझाड, सौ. आशा डोरले ,मंजुषाताई बुरडे ,भोजराज वाघमारे, मनिष वासनिक, आरजु मेश्राम, राहूल वाघमारे, जवाहर निर्वाण, उमेश ठाकरे, सुनिल साखरकर, रुपेश खवास, गणेश बाणेवार, संजय बोंदरे, बंडू चेटूले, रजनिश बन्सोड, विजय ईश्वरकर, विष्णु कढिखाये, अरुण अंबादे, लोकेश नगरे, संजय वरगंटीवार, किरण वाघमारे, सौ. हर्षिला कराडे, राजु सलाम पटेल, प्रदीप सुखदेवे, जुगल भोंगाडे , शेखर गभने ,हितेश सेलोकर, अमन मेश्राम , राजेश वासनिक, ओमप्रकाश चव्हाण, प्रतिक मेश्राम, फरहान पटेल, रवि लक्षणे, सौ.इंदू रविकुमार, पांडुरंग लिमजे, गणेश मलेवार, विकेश मेश्राम, नुमेश्वर गाढवे, सोनु कनोजे, किर्ती कुंभरे, सौ. संध्या बोदले, सौ. रिना साखरकर, सौ. संगिता चव्हाण, अमय डोंगरे, सुधीर मानापुरे व फार मोठ्या संख्येने शहरातील व ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.