रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : गट ग्रामपंचायत वाडी अदमपूर जाफरापूर येथील ईसापुर रोडवरील नवयुग विद्यालय चा रस्ता गत 15 वर्षां पासून प्रलंबित होता.नवयुग शाळेमध्ये वाडी अदमपूर अवार जाफरापूर, ईसापुर, उकळी इत्यादी पंचकोशीतील गावातील विद्यार्थ्यांचा समावेश असून या विद्यालयात शिक्षण घेत असताना गत 15 वर्षापासून रस्त्याची गंभीर समस्या होती पावसाळ्यात शालेय विद्यार्थी व या रोडवर राहणाऱ्या सर्व नागरिकांचे व नवयुग शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे हाल होत होते.या समस्येचा कर्तव्यदक्ष सरपंच सरपंच रुपेश राठी व ग्रामपंचायत पदाधिकारी उपसरपंच विठ्ठल खारोडे व सदस्य गण ग्रामपंचायतच्या पाठपुराव्यामुळे या रोड साठी निधी उपलब्ध करून आज दिनांक 08/06/23 गुरुवार रोजी सिमेंट काँक्रीट रोडची सुरुवात करण्यात आली.यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी मंडळी गुणवंत चितोडे एकनाथ ताथोड दाते सर संतोष खारोडे प्रमोद पातोंड रामभाऊ भोंगळ विठ्ठल भाकरे मंगेश चितोडे श्याम हिंगणे मनोहर जती संतोष कोतकार प्रणित चव्हाण रोहीत बनसोड प्रतिक खारोडे हरीश पाथ्रीकर यांची उपस्थिती लाभली या रोडच्या मंजुरीसाठी सरपंच रुपेश राठी यांना एकनाथ ताथोड उपसरपंच विठ्ठल खारोडे जितेंद्र जाधव मंगेश वाघ कैलासभाऊ कोतकर श्रीराम इंगळे नितीन साबळे रंजीत बोदडे या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तसेच नवयुग विद्यालयाचे मुख्याध्यापक टाले सर गावंडे सर माकोडे सर तोडोकार सर मोरे सर पाथ्रीकर सर यादगिरे सर गादे सर लवाळे सर दाते सर व गावकरी मंडळी मोलाचे योगदान दिले.

