शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड : बोंढार हवेली तालुका जिल्हा नांदेड येथील अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी..! अशी मागणी भिम टायगर सेना सामाजिक संघटना उमरखेड तर्फे उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय उमरखेड जिल्हा यवतमाळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदना देण्यात आले. बोंढार येथील भीमसैनिक अक्षय भालेराव यांनी गावामध्ये भीम जयंती का काढली या कारणाने त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
चौकट : संविधानाची निर्मिती भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भीम जयंती काढणे या देशात गुन्हा होत चाललेला आहे..! ही मानसिकता कुठेतरी थांबली पाहिजे…! जातीवादी गावगुंडांनी निर्घृण हत्या घडवून आणली व तसेच गावातील बौद्ध वस्तीवर दगडफेक केली या प्रकरणातील सर्व आरोपीवर कठोर कार्यवाही करून पीडित कुटुंबाला न्याय देण्यात यावा तसेच अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयास तातडीने 50 ल


