मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी वै. : दि. ०८ जून २०२३ परळी वैजनाथ शहरातील बसस्थानक परिसरात दि. ६ जून २०२३ रोजी रात्रीच्या वेळी ४ लाख ९० हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग एका व्यक्तीच्या हातातून पळवल्याची घटना घडली. परळी शहर आणि परिसरातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढला असून पोलिस प्रशासनाने या प्रकाराकडे जातीने लक्ष घालून वाढत चाललेले चोर्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा चोरट्यांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दि. ६ जून २०२३ परळी वैजनाथ शहरातील प्रतिष्ठित व्यापारी यांच्याकडे वसूलीचे काम करणारे रमेश ज्ञानोबा पाचनकर हे संध्याकाळी काम आटोपून घरी जात असताना परळी वैजनाथ बसस्थानक ते शिवाजी चौक या रस्त्याने चालत घरी जात असताना तीन अज्ञात युवकांनी स्कुटीवर येऊन हातातील ४ लाख ९० हजार रूपये रोख रक्कम असलेली बॅग हिसकावुन घेऊन भरधाव वेगाने निघून गेले. याप्रकरणी परळी वै. येथील पोलिस ठाण्यात रमेश ज्ञानोबा पाचनकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेमुळे खळबळ उडाली असून शहरातील बसस्थानक, शिवा