शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान आणि स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार ( ता. ०७ ) रोजी आयोजित ‘ कविता मिरगाच्या ‘ या नवव्या वर्षातील बहारदार काव्य मैफलीत सादर झालेल्या कवितांनी रसिक श्रोते भारावून गेले. काव्य मैफलीचे सूत्रसंचालन करणारे गेवराई येथील कवी डॉ. समाधान इंगळे शेतकऱ्यांची वेदना आपल्या कवितेतून व्यक्त करताना म्हणतात, ” अंधारात तो गोठ्यात निजतो, तुम्हाला तुपाचा दिवा, शाळेत पोट्ट, ढोरामागे जातंय अनवानी पायाने जवा, तीळतीळ तुटतय काळीज पाहून, लाहीलाही त्याच्या जीवा, आमचं फ्युचर रानावनातून, आपलं करिअर घडवतंय, दुध डेरीला जातय…” माजलगावचे कवी प्रभाकर साळेगावकर यांनी सादर केलेल्या विडंबन काव्याने रसिकांची मने जिंकून घेतली. ते आपल्या कवितेत म्हणतात ,” वरी ढगात ढग डुचमळ, खाली उन्हाचं वाढतय बळ, हे बघुन रान माझं जळं, किती जिवानी सोसावी झळ, कशी ढगाला येईना कळं, पाणी कुण कडं पळं.” छत्रपती संभाजी नगर येथील कवयित्री आशा डा


