शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : ह्यूमन पीपल टू पीपल इंडिया अंतर्गत उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 40 शाळांमध्ये सुरू असणाऱ्या कदम उपक्रमाच्या माध्यमातून कदम उपक्रमाचे तालुका संयोजक राहुल मोहितवार यांच्या माध्यमातून यवतमाळ जिल्हा परियोजना अधिकारी कमल किशोर यांच्या मार्गदर्शनात उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सर्व शाळांमध्ये उन्हाळी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गामध्ये पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्व जगभरात साजरा होत असतो या जागतिक पर्यावरणा दिनानिमित्त मुळावा केंद्रातील सुकळी न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वृक्ष लागवड करून व पर्यावरण संगोपनाची प्रतिज्ञा घेऊन पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या परिसरात वृक्षांची लागवड करून, शाळा परिसर स्वच्छ करून, चित्राच्या माध्यमातून ग्लोबल वार्मिंग, प्रदूषण मुक्त शाळा अशा प्रकारचे चित्र रंगवून जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व पटवून देण्याच्या एक छोटा प्रयत्न करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल नारे